केसनंद रोड वाघोली ऑक्सी अल्टीमा रोडवर ड्रेनेज लाईनचा प्रश्न बाबत पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी सोबत चर्चा केली असून आठ दिवसांमध्ये प्रश्न मार्गी लागणार आहे : संदीप सातव (जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा)
वाघोली, पुणे: केसनंद रोड वाघोली मधील छत्रपती नगर ऑक्सी अल्टीमा रोडवरील ड्रेनेज लाईन मुळे खराब पाणी नागरिकांच्या बोरवेल मध्ये जात आहे. या विषयावर चिंता व्यक्त करून, पुणे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी पाहणी करून पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. याबाबत समंधित ड्रेनेज लाईनचे काम आठ दिवसांमध्ये करण्याचा निर्णय घेण्याचा आला, आठ दिवसांच्या आत ड्रेनेज लाईनमध्ये नवीन पाईप टाकण्यात लागणार आहे.
हा विषय गंभीरपणे घेऊन त्याची पाहणी करण्यात आल्यानंतर, महानगरपालिका अधिकारी यांनी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यातील बातम्या ऑक्सी अल्टीमा रोडवरील ड्रेनेज लाईनमध्ये पाण्याच्या बोरव्याची माहिती दर्शवित आहे आणि त्याच्या सुरक्षेच्या प्रश्नांना मांडते.